वैद्यकीय मदतीसाठी सदैव तत्पर – डॉ केतकीताई पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२४ । आगामी काळ सण-उत्सवांचा असून पोलीस बांधवांवर अधिक जवाबदारी येते. आरोग्य हीच संपदा आहे. आम्ही वैद्यकीय मदतीसाठी सदैव तत्पर आहे असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी ताई पाटील यांनी केले. त्या ,पोलीस अधीक्षक कार्यालयातील मोफत आरोग्य शिबीर प्रसंगी बोलत होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आजपासून सुरु झालेल्या मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांना जळगाव येथे पोलिस अधीक्षक कार्यालयातून सुरुवात झाली. कर्तव्य बजावत असताना जेवण-झोपेच्या वेळा पाळल्या जात नाही, त्यासाठी ठराविक कालावधीनंतर आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे, या पुढे हि गोदावरी फाऊंडेशन वैद्यकीय मदतीसाठी सदैव तत्पर राहील, असेही डॉ केतकी ताई पाटील म्हणाल्या.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यालयातर्फे रविवार दिनांक १ सप्टेंबर पासून राज्यभरात विशेष वैद्यकीय मदत सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन आज जळगाव येथील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातून करण्यात आले. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजू मामा भोळे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी ताई पाटील, डी एम कार्डिओलॉजिस्ट डॉ वैभव पाटील, डॉ रितेश पाटील, डॉ धर्मेंद्र पाटील, डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रेमचंद पंडित, डॉ एन एस आर्वीकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
या प्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांनी दररोज आपल्या व्यस्त जीवनशैलीतून एक तास स्वतःसाठी द्यावा, जेणेकरून प्रकृती स्वास्थ्य चांगले राहील असे आवाहन केले.अध्यक्षीय भाषणात पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी या सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे कौतुक केले. तसेच फिटनेस किती महत्वाचा आहे हे सांगून शिबिरात केल्या जाणाऱ्या तपासण्याची माहिती दिली. या शिबिरात डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ञ् डॉक्टरांची टीम आणि नर्सिंग टीम उपस्थिती होती. आलेल्या सर्वांची नोंदणी करून घेत आवश्यकतेनुसार तपासणी करण्यात आली. या प्रसंगी शासकीय वैद्यकीय रुग्णालयांची टीम चेही सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ रितेश पाटील यांनी केले. राज्यभरात आगामी दोन महिन्यात 25 हजार कॅम्प होणार असून जळगाव जिल्ह्यात 1200 कॅम्प चे नियोजन करण्यात आले आहे. या शिबिरांना आजपासून प्रारंभ झाला असून सर्व प्रथम पोलीस बांधवांचे आरोग्य तपासणी करण्यास प्राधान्य देण्यात आल्याचे मान्यवरांनी भाषणातुन सांगितले. तसेच आपल्या व्यस्त जीवनशैलीतून दररोज स्वतःसाठी एक तास वेळ काढून आरोग्यासाठी द्यावे असे आवाहनही केले. केवळ पोलीसच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांची देखील येथे तपासणी केली जात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गौरी जोशी यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पोलीस टीमसह आशिष भिरूड, रत्नशेखर जैन यांच्यासह टीम चे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या उद्घाटना नंतर मान्यवरांनी आरोग्य शिबिरास भेट दिली.
शहरासह जिल्ह्यात मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर
मोफत सामुदायिक शिबिराचे पोलीस अधीक्षक कार्यालयात उदघाटन झाल्यावर शहरात वाघ नगर स्टॉप आणि हरी विठ्ठल नगर येथे तसेच रावेर तालुक्यात ८ ठिकाणी शिबीर संपन्न झाले. यात मेडिसिन, सर्जरी आणि स्त्री रोगाची तपासणी करण्यात आली. आगामी दोन महिन्यापर्यंत विविध ठिकाणी हे शिबीर होणार आहे. तरी नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी केले आहे.