⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 26, 2024
Home | जळगाव जिल्हा | आता मुतखड्याच्या ऑपरेशनसाठी हजारो रुपये मोजण्याची गरज नाही ; जळगावात झाली ‘ही’ सोय

आता मुतखड्याच्या ऑपरेशनसाठी हजारो रुपये मोजण्याची गरज नाही ; जळगावात झाली ‘ही’ सोय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुतखड्यावर उपचार करणाऱ्या अद्यावत मशीनचे जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात उदघाटन

जळगाव लाईव्ह न्यूज | 15 मार्च 2024 | जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सुविधा मजबूत व्हाव्यात यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीतून अनेक उपकरण घेतली जे महाराष्ट्रात इतरत्र नाहीत. आता मुतखडयासाठी नव्या पिढीतील तंत्रज्ञान असलेले ‘स्पार्क एक्स्ट्राकॉर्पोरियअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी’ ही अद्यावत मशीनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिली. अशी अद्यावत मशीन उत्तर महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही ती जळगाव मध्ये बसविण्यात आली असून कोणतीही वेदना होणार नाही अशी ही मशीन काही सेंकदात मुतखडा फोडते आणि तें लघवी वाटे विना अडथळा बाहेर पडते. फक्त एक पॅरासिटॉमॉल गोळी खाऊन रुग्ण घरी जाऊ शकतो असे तज्ञ डॉक्टरांनी आपल्याला सांगितले. आता मुतखड्याच्या ऑपरेशनसाठी गोरगरीबाला हजारो रुपये मोजावे लागणार नाहीत. अशी सोय जळगाव मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याचे आपल्याला समाधान असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखविली.

जिल्हा वार्षिक योजना निधी अंतर्गत मंजूर झालेल्या ‘ ई. एस.डब्लु. एल. सेंटर ऑफ एक्सलन्स ‘ चे उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. या नव्या यंत्राद्वारे होणारी एक विना-शस्त्रक्रिया प्रक्रिया आहे. जी मूत्रमार्गाच्या काही भागांमध्ये मुतखडे फोडण्यासाठी शॉकवेव्ह वापरते. शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी हा किडनी स्टोनसाठी एक सामान्य उपचार आहे.

कधीकधी या प्रक्रियेला स्पार्क एक्स्ट्राकॉर्पोरियअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी (Spark EM ESWL) म्हणतात. शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी मुतखडे फोडण्यासाठी उच्च-उर्जा शॉक (उच्चदाब) लहरी वापरते. किडनी स्टोनचे छोटे तुकडे नंतर मूत्रमार्गात अधिक सहजतेने जाऊ शकतात. शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी रुग्णाची वेदना कमी करण्यात मदत करु शकते. मूत्रपिंडातील (किडणी) मुतखडे काढून टाकण्यासाठी अधिक आक्रमक शस्त्रक्रिया टाळण्यात ते मदत करु शकते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव संस्थेमध्ये नवीनतम पिढीतील इलेक्ट्रोमॅग्नेटिक शॉकवेव्ह एमिटर टेक्नॉलॉजी (Spark EM ESWL) सह ही सर्वात स्वस्त आणि जागतिक दर्जाचे उत्पादन आहे. जे मत्रपिंड आणि मुत्राशयातील मुतखडे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास मदत करते.स्पार्क हे जागतिक उत्पादन आहे आणि कंपनी जगभरातील 50+ पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते. सदर कंपनी ISO13485 आणि CE1984 प्रमाणक आणि गुणवत्ता व्यवस्थपन मान 9001:2008 सह उत्पादन प्रदान करते.अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.