⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

गोमांसानी तस्करीच्या संशयातून ट्र्क पेटविला, तरुणांवर पोलिसांकडून लाठीचार्ज ; पाळधीत तणावाचे वातावरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२३ । ट्रकमधून गोमांसाची तस्करी होत असल्याच्या आरोपातून संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटवून दिल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवले. ही घटना गुरुवारी रात्री पाळधी बायपास रोडवर घडली असून या घटनेने पाळधी गावासह परिसरात रात्री १२.३० वाजेपर्यंत तणावाचे वातावरण होते.

नेमकी घटना काय?
गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास बांभोरी एसएसबीटी कॉलेजजवळ पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी एक ट्रक थांबला होता. त्यातून दुर्गंधी येत असल्याने तरुणांना संशय आला. यावेळी यातून गोमांसाची वाहतूक होत असल्याचा संशय काही जणांना आला. त्यांनी या संदर्भात पाळधी पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचार्‍यांना माहिती देऊन ट्रक थांबवून धरला. मांस वाहून नेणारा ट्रक पकडून दिल्यानंतर देखील पोलिस कर्मचाऱ्याने तो जप्त करुन न घेता महामार्गाच्या दिशेने सोडल्याचा समज झाल्याने काही तरुणांनी ड्रायव्हरला मारहाण करत ट्रक पेटवून दिला.

यामुळे परिसरात बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. तातडीने येथे अतिरिक्त कुमक मागविण्यात आल्याने वातावरण निवळले. तर या प्रकारामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. रात्री उशीरापर्यंत हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवले. तर, रात्रीच जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. याप्रसंगी जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याचे वृत्त आहे. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.