जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२२ । रावेर रेल्वे स्टेशन येथे शेतकरी व फळ बागायतदार मंडळ संस्थेच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आलेले असून या इमारतीचे खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह केळी उत्पादक महासंघाचे माजी अध्यक्ष भागवत पाटील, माजी जि.प.सभापती सुरेश धनके, जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, प.स.सदस्य जितू पाटील, संदीप सावळे, पी.के.महाजन, तालुका सरचिटणीस सी.एस.पाटील, रावेर शहराध्यक्ष दिलीप पाटील, शुभम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले तर ऍड. चंद्रदीप पाटील यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी मंडळाचे पदाधिकारी, किशोर गणवाणी, रविंद्र पाटील, मोहन पाटील, संजय अग्रवाल, धोंडु पाटील, संजय पाटील, सुरेश गणावाणी, संजय चौधरी, विकास महाजन, किशोर पाटील, सतीष पाटील, नितीन गणवाणी, हरिभाऊ पाटील, गंभीर पाटील, विनायक महाजन, ए.आर.पाटील यांच्यासह रेल्वेचे नावेद शेख, मिश्रा, मनोज श्रावक, विकास अवसरमल, संतोष पाटील, वासुदेव नरवाडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज