---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावात EVM ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले पडले बंद ; जिल्हाधिकारी म्हणतात..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२४ । लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात १३ मेला निवडणूक पार पडली. यानंतर आता ४ जून रोजी निकाल लागणार असून या निकालाची उत्सुकता प्रत्येकाला आहे. दरम्यान, जळगावच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद पडल्यामुळे खळबळ माजली आहे. मात्र यामागील कारण जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी दिले आहे.

evm cctv jpg webp

आज सकाळी 9 वाजेपासून ते 9.4 मिनिटापर्यंत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद पडले होते. जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी फोन वरून कळवली माहिती दिली. त्याला, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुजोरा दिला आहे.

---Advertisement---

वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटोर वरून इन्व्हर्टर वर वीज पुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही कॅमेरेचे डिस्प्ले बंद झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. डिस्प्ले बंद झाले असले तरी मात्र सर्व 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्या काळातील व्हिडिओ शूटिंग देखील केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---