---Advertisement---
जळगाव शहर

जळगावच्या रणरणत्या उन्हात भाजी विक्रेत्यांना मिळाली ‘मायेची सावली’ !

---Advertisement---

बॉक्स ऑफ हेल्प’ फाउंडेशन अभिनव उपक्रम ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली प्रेरणा – सुधा काबरा

जळगाव लाईव्ह न्यूज | २५ एप्रिल २०२३ |  जळगावच ऊन किती रणरणत आहे हे संपूर्ण देशात सर्वश्रुत आहे. अशातही व्यवसाय करणारे गरीब व्यवसायिक या उन्हात सावलीच्या शोधात व्यवसाय करताना पाहायला मिळतात.कित्येकदा ते भर उन्हात व्यवसाय करतात.कारण स्वतःसाठी छप्पर किंवा छत्री घ्यावी इतकेही पैसे या गरजू व्यवसायिकांकडे नसतात. अशा गरजूंना ‘मायेची सावली’ मिळावी म्हणून आणि रणरणत्या उन्हापासून त्यांचा बचाव व्हावा या उद्देशाने गरजूंना ‘बॉक्स ऑफ हेल्प’ फाउंडेशन तर्फे छत्री वाटप करण्यात आला. या फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा काबरा यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले.

shobha kabra jpg webp webp

याप्रसंगी ‘बॉक्स ऑफ हेल्प फाऊंडेशन’च्या सचिव मीनल लाठी, सदस्य माधवी असावा, स्वाती सोमाणी, उषा राठी आणि सुनीता चौधरी आदी उपस्थित होते. बॉक्स ऑफ हेल्प फाऊंडेशनने शहरातील सुभाष चौक, महाराणा प्रताप चौक तसेच शिव कॉलनी येथे छत्री वाटपाचा उपक्रम राबविला.

---Advertisement---

जैसे धूप और बारिश में छाते की छाया, वैसे गरीबों के साथ मोदीजी का साया. शहरातील भाजीपाला विक्रेते नेहेम उन्हात बसलेले असतात अचानक छत्री मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.बॉक्स ऑफ हेल्प फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सुधा काबरा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, जळगावचे वातावरण नेहमी बदलत आहे. कधी उन तर कधी पाऊस असे झाले आहे. उन आणि पाऊस या दोघांमध्ये छत्री साथ देते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेत आम्ही हा वाटप केला. ज्याप्रमाणे उन्हात आणि पावसाळ्यात छत्री साथ देते, त्याचप्रमाणे गरिबांना मोदीच साथ देऊ शकता, ही गोष्ट डोळ्यासमोर ठेऊनच पंतप्रधान मोदी यांचे चित्र असलेल्या छत्रींचे वाटप आम्ही केले आहे.याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गौरवार्थ ‘जी- २०’चा लोगो वापरला आहे. आणि छत्रिवर बॉक्स ऑफ हेल्प फाऊंडेशनचा लोगो सुद्धा आहे असे काबरा म्हणाल्या.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---