संपूर्ण जळगाव जिल्ह्यात केवळ ‘अंकल अंकल’चीच चर्चा !
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२३ । विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरू आहे. अधिवेशन म्हटलं तर राज्यातील मोठे राजकीय नेते नेहमीच अधिवेशनामध्ये एकमेकांना चिमटे काढण्यात व्यस्त असतात. त्यातच आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधानसभेमध्ये नुकतीच तुफान फटकेबाजी केली. यावेळेस त्यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सध्या संपूर्ण जिल्ह्यात सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
यामध्ये अजित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांना ‘अंकल’ म्हटलं आहे आणि काकूला सांगू का? असा इशारा दिला आहे यामुळे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, विधानसभेच्या अधिवेशना वेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना डिवचलं. अजित पवार भाषण असताना गिरीश महाजन यांनी काहीतरी बोलायचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवारांनी मंत्री महाजन यांना गिरीश असा एकेरी उल्लेख करत आवाज दिला. मात्र महाजन पुन्हा काहीतरी बोलले. यावर अजित पवार अंकल अंकल म्हणून त्यांना आवाज दिला. अंकल सांगू का काकीला? अशी गुगली देखील टाकली . अजित पवारांच्या या गुगलीवर महाजन काहीच प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत. हा प्रकार समोर आल्यानंतर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अजित पवार कोणत्या रहस्येचा उलगडा करणार असल्याचा इशारा देत आहेत? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. अजित पवार यांनी गिरीश महाजन यांचा एकरी उल्लेख करून देखील भाजपकडून विरोध का झालं नाही? याबाबतची शंका नेटकरी उपस्थित करत आहेत.