⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी चौघे बेपत्ता, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । जिल्ह्यातील विविध ठिकाणी हुन चार जण बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी त्या त्या परिसरातील पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

सविता रवींद्र महाजन ( वय ५०, रा. रसलपूर ता. रावेर ) ही स्त्री दि. २९ मे रोजी सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास विरोदा ता. जि. ब्रह्मणपूर येथे गेली असताना तेथून रावेर येथे बैठकीला जाऊन येते असे सांगून निघून गेली. सदर स्त्री परत न आल्याने रवींद्र लक्ष्मण महाजन (वय ५५) यांनी दि. ५ रोजी रावेर पोलिसांत हरविल्याची फिर्यादी दिली, त्यानुसार नोंद करण्यात आली. तपास अंमलदार पोना.जगदीश पाटील करीत आहे.

स्नेहा मनोहर तडवी (वय २४, रा.वडती ता. चोपडा ह.मू पाल. ता रावेर ) ही तरुणी दि. २९ मे रोजी घरातून काही एक न सांगता निघून गेली. तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून न आल्याने. अमर मनोहर तडवी (वय ३०) यांनी दि. ५ रोजी रावेर पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्यादी दिली, त्यानुसार हरविल्याची नोंद करण्यात आली. तपास अंमलदार सतीश सानप करीत आहे.

हयात शेख मासूम मन्यार (वय २२, रा चिनावल ता. रावेर ) हा तरुण दि. २८ मे रोजी घरातून नायलॉनची पिशवी घेऊन निघून गेला. त्याचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता. मिळून न आल्याने त्याच्या भाऊ शेख अल्ताफ शेख मन्यार ( वय २६) यांनी दि.५ रोजी सावदा पोलिसांत फिर्यादी दिली, त्यानुसार बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. तपास अंमलदार पोना.मजहर पठाण करीत आहे.

रुपाली रवींद्र बावस्कर (वय २० रा. पिंपळगाव ता.भुसावळ ) ही तरुणी दि.२२ मे रोजी बेपत्ता झाली. ममता रवींद्र बावस्कर ( वय ३८) यांनी दि. ५ रोजी वरणगाव पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्यादी दिली, त्यानुसार हरवल्याची नोंद करण्यात आली. तपास मनोहर पाटील करीत आहे.