काँग्रेसचे अध्यक्ष विजय महाजन यांनी निवेदन देत, कंगना राणावत वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत नेहमी वादग्रस्त वक्त्यव्यामुळे चर्चे चा विषय ठरते. स्वातंत्र्य हे भिकेत मिळालेले असल्याचे वक्त्यव्य केल्या मुळे पुन्हा कंगना चर्चेचा विषय बनली आहे. एरंडोल येथील तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय महाजन यांनी एरंडोल पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना अनिनेत्री कंगना राणावत वर गुन्हा दाखल करण्यात यावा या बाबत निवेदन देण्यात आले.
अभिनेत्री कंगना राणावत यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताला सन १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे भिकेत मिळालेले असल्याचे नमूद केलेले आहे व खरे स्वातंत्र हे सन २०१४ मध्ये मिळाल्याचे त्यांनी म्हटलेले आहे . हे म्हणणे देशाचा आणि देशातील नागरिकांचा अपमान आणि अवमान करणारे असल्याचे म्हणुन भारतीय स्वातंत्र्यांचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना एका अभिनेत्रीने असे कथन करणे हे कोणत्याही भारतीय नागरिकाच्या संवेदनाशिल मनाला कधीही भरुन न येणारी इजा अगर दुखापत करणारे असल्याचे म्हटले आहे.
तसेच एवढेच नव्हे तर ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याठी आपल्या संसाराची होळी केली आणि आपल्या जीवाची पर्वा न करता इंग्रजाविरुध्द लढा दिला आहे तसेच अनेकांनी स्वातंत्र्यांच्या यज्ञकुडात स्वतःला झाकून दिलेले आहे आज रोजी सुध्दा अनेक स्वातंत्र सैनिक आणि त्याचे कुटुंबिय भारतात असतांना अभिनेत्री कंगना रणौत यांनी वरील प्रमाणे वक्तव्य करुन देशाची आणि या देशावर प्रेम प्रत्येक भारतीय नागरीकाची मान शरमेने खाली घालण्यास भाग पाडलेले आहे .
त्यामुळे अनेक नागरीकांच्या भावनेला ठेच पोहचली असून त्याचे तर्फे मी प्रतिनिधीक स्वरुपात निषेध नोंदवित असल्याचे म्हणत या निवेदना व्दारे अभिनेत्री कंगना राणावत यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा . त्यांना दिलेला पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा अशी मागणी केली आहे.