जिल्ह्यात दीड महिन्यात एसटीचे ४१ कर्मचारी बडतर्फ
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । विभागातील एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देवूनही कामावर हजर न होणाऱ्या एसटी महामंडळाच्या ४१ कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे. मंगळवारीही नऊ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई झाली.
आजपर्यत ३५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनासह ८६ कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या नोटीस देवून आठ दिवसांत खुलासा सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ही कारवाई केली जात आहे. कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली आहे. कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाईचे आदेश मागे घेण्यात येणार असल्याचे सांगितले जाते आहे. यानंतरही कर्मचारी मागण्यांवर ठाम आहेत. कामावर रूजू न होणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
विलिनीकरणाच्या मागणीबाबत बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यात काय निकाल लागताे? याकडे एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. याची प्रवाशांनीही उत्सुकता आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन
- जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- ग्राहकांना दिलासा ! मकर संक्रांतीनंतर जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदीचा भाव घसरला..
- खेळामध्ये सांघिक भावना असणे खूप महत्वाचे : आ. राजूमामा भोळे