⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना होणारा वीज पुरवठा सुरळीत करा : भाजपा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । महावितरणकडून शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना होणारा वीजपुरवठा गेल्या काही दिवसांपासून अनियमित पद्धतीने व कमी दाबाने होत असून तो सुरळीत करून अखंडित पद्धतीने ८ तास देण्यात यावा. अश्या मागणीचे निवेदन खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कृषिपंपांना किमान ८ तास वीज देण्याचे धोरण असताना कुठे चार तास तर कुठे दोन तास वीजपुरवठा देण्यात येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असून शेतकऱ्यांनी या संदर्भात वारंवार तक्रारी करून देखील महावितरण यावर कुठलाही दखल घेऊन उपाययोजना करताना दिसत नाही.त्यामुळे कृषी पंपांना वीजपुरवठा सुरळीत नझाल्यास महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी बोलताना दिला.