⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | महाराष्ट्र | विद्यार्थ्यांसह पालकांची प्रतीक्षा संपणार ! 10वी-12वी च्या निकालाबाबत बोर्डाची महत्वाची माहिती

विद्यार्थ्यांसह पालकांची प्रतीक्षा संपणार ! 10वी-12वी च्या निकालाबाबत बोर्डाची महत्वाची माहिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२३ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना लागली असून अशातच निकाल लवकरच जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या सुरुवातीला जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तयारी सध्या सुरू आहे. या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याबाबची विचारणा राज्य मंडळ विभागीय मंडळाकडे सातत्याने होत आहे.

याच दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘दहावी-बारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा निकाल जाहीर होईल. तसंच निकालाबाबत लवकरच अधिकृतपणे माहिती देण्यात येईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा मार्च महिन्यात घेतली होती. 2 ते 25 मार्च या कालावधीत ही परीक्षा पार पडली होती. दहावीच्या परीक्षेला सुमारे 16 लाख विद्यार्थी बसले होते. तर बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फेब्रुवारी ते मार्च दरम्यान झाली होती. 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत 14 लाख विद्यार्थी बसले होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.