महाराष्ट्रातील आजच्या पावसाबाबत IMD कडून अंदाज जाहीर ; जळगावात पावसाची स्थिती काय?

जुलै 8, 2025 10:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२५ । सध्या राज्यात सर्वत्र पावसाने चांगलाच जोर पकडला असून अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. दरम्यान आता आगामी पाच दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

rn8 july

आज विदर्भात अनेक ठिकाणी तर कोकण, घाटमाथ्यावर मोजक्या ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. आज राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यात आज आणि उद्यासाठी जळगाव जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज पावसाचा अंदाज कुठे

अति मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

विदर्भातील अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर सोडून इतर सर्व जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट घोषित केला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

मुसळधार पाऊस (येलो अलर्ट)

धुळे, नंदुरबार, जळगाव, पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग, अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

25 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

दरम्यान, 8 जुलै रोजी राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार आहे. पुढील तीन दिवस पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now