शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या.. हवामान खात्याचा ‘या’ राज्यांना मुसळधार पाऊस इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२३ । उत्तर भारतातील पर्वतांपासून ते मैदानी प्रदेशापर्यंत थंडीचा कहर सुरु आहे. मात्र अशातच शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी एक बातमी आहे. देशातील १० राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हा अंदाज आजपासून पुढील ४ दिवसाठी वर्तवण्यात आली आहे.

या राज्यात पावसाची शक्यता?
भारतीय हवामान खात्याने 23 ते 26 जानेवारी दरम्यान पर्वतांवर पाऊस आणि बर्फवृष्टी दरम्यान पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

उत्तर भारतातील पर्वतांपासून ते मैदानी प्रदेशापर्यंत थंडीचा कहर सुरु आहे. मात्र तापमानात बदल झाल्याने काही प्रमाणात येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आजपासून पुन्हा हवामान बदलणार असल्याने थंडी आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

स्कायमेट खाजगी हवामान खात्यानुसार, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि जम्मू-काश्मीरमध्ये पुढील 24 ते 48 तासांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी अपेक्षित आहे. दुसरीकडे, 24 ते 28 जानेवारी दरम्यान लडाख, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या अनेक भागात पाऊस आणि बर्फवृष्टी आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो.

महाराष्ट्रातही पावसाचा इशारा?
राज्यात 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारीदरम्यान मराठवाडा, विदर्भ आणि लगतच्या परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 25 जानेवारीपासून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

image 6
शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या.. हवामान खात्याचा 'या' राज्यांना मुसळधार पाऊस इशारा 1