जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२३ । उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र झाली आहे. राज्यात देखील अतिथंड वारे सुरू झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. मात्र ऐन थंडीत राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यातच मागच्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण असल्याने काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होते तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आज (दि.05) ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी धुके पडल्याने आज दिवसभर ढगाळ वातावरणाबरोबर उन्हाच्या झळा बसण्याची शक्यात आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम असला, तरी मागील दोन ते तीन दिवसापासून राज्याच्या कमाल तापमानात घट होत असल्याने दिसून येत आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रातही धुक्याची चादर अनुभवायला येत आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान होते. तर अमरावती जिल्ह्यातील तिवसा भागात पावसाच्या सरी पडल्या. आता ह्या अवकाळी पावसामुळे तूर, हरभरा, कांदा अशी पिकं धोक्यात आली आहेत.
दरम्यान मागच्या 24 तासांत पुणे 30.8 (13.8), जळगाव 27.8 (10.5), धुळे 27 (7.6), कोल्हापूर 29.9 (17.5), महाबळेश्वर 27.5 (14.4), नाशिक 30.4 (13.2), निफाड 30.2 (10.6), सांगली 30.2 (19.8), सातारा 30.5 (17.4), सोलापूर 35 (20.3), सांताक्रूझ 39 (16.4), रत्नागिरी 31 (19.2), औरंगाबाद 29.8 (11.5), नांदेड 30.6 (19.0), उस्मानाबाद – (15.6), परभणी 31.3 (17.4).
अकोला 30.2 (17.4), अमरावती 28.8 (14.1), बुलडाणा 28.6 (13.2), ब्रह्मपुरी 28.6 (16.5), चंद्रपूर 28.06 (17.4), गडचिरोली 28.06 (15.4), गोंदिया 26.6 (17.2), नागपूर 26.6 (17.5), वर्धा 25.9 (16), यवतमाळ 29.5(16.5) तापमानाची नोंद झाली.
शेतकऱ्यांची चिंता वाढली…
सध्या शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड केली आहे. आधी खरीपात झालेल्या अतिवृष्टीमुळे हातून सगळं काही गेले असतांना, रब्बीवर आर्थिक गणित अवलंबून आहे. मात्र असे असतानाच वातावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. थंडी कमी जास्त होत असल्याने याचा फटका गव्हाचा पिकाला बसत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे देखील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. सोबतच याच फटका फळ बागांना देखील बसत आहे.