राज्यात पुन्हा कोसळधार ; 7 जिल्ह्यांना रेड तर 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

ऑगस्ट 9, 2022 11:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. महाराष्ट्र-कर्नाटकच्या किनारपट्टीदरम्यान द्रोणीय स्थिती असून त्यामुळे राज्यभर पाऊस बरसत आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. आज मंगळवारी पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे, तर मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. Rain Alert News In Maharashtra Today

rain 1 jpg webp

तसेच जळगाव जिल्ह्याला देखील पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दोन आठवड्यांची विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. जळगाव जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर सोमवारी दुपारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. मात्र सायंकाळी ७ वाजेनंतर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

आज मुंबई आणि पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाचं हे आक्राळविक्राळ रुप पुढच्या दोन ते तीन दिवसांसाठी तसंच असू शकतं, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी खरंच नद्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनावरील दबाव वाढताना दिसतोय. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट –
कोल्हापूर, सातारा, नांदेड, अमरावती, ठाणे मुंबई, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. याठिकाणी आजही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट –
सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगांव जिल्हा दि09/ 8/2022
बोदवड-21
भडगाव-12
भुसावळ-46.2
पारोळा-31
जामनेर-18
चोपडा-75
चाळीसगाव-31
रावेर-11
मुक्ताईनगर-12
धरणगाव-18
यावल-50.5
एरंडोल-33
जळगाव-34

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now