⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

IMD Alert : आज उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता, पुढचे तीन असा आहे अंदाज

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । काही दिवसाच्या खंडानंतर राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील तीन चार दिवसात राज्यातील अनेक भागात पावसाचा तडाखा सुरूच आहे. अशातच आज (ता. 15) पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याकडून आज उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, तर उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मागच्या काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. पुढचे काही दिवसात राज्यात पावसाचे राहणार आहे. हवामान खात्याकडून आज (ता. 15) उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा (येलो अलर्ट) अंदाज आहे. तर विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर महाराष्ट्र्रात अतिवृष्टीची शक्यता?
हवामान खात्याने आज उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. यानंतर पुढील तीन दिवसापर्यंत उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिलेला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे वार्षिक सरासरी ८५ टक्क्यावर पोहोचली आहे. आज देखील जिल्ह्यातील काही ठिकाणी सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

जळगांव 15/ 9/2022
अमळनेर-14
भुसावळ-3.8
जामनेर-10
चोपडा-7
चाळीसगाव-0
रावेर-8
मुक्ताईनगर-22
धरणगाव-22
यावल-18
एरंडोल-10
जळगाव-5.3