जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२३ । हवामान खात्याने राज्यात पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात झालेल्या बदलांमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे म्हटले आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना प्रथमच रेड अलर्ट दिले आहे. तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट दिले आहे. यामुळे राज्यातील काही भागांना अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी?
१८ रोजी पुणे आणि रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत १९ रोजी रेड अलर्ट दिला आहे. त्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. पाच दिवस राज्यात चांगलाच पाऊस होणार आहे.
आज या जिल्ह्यांना येलो अलर्ट :
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला
18 Jul, पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. कृपया जिल्ह्यातील घाट भागांसाठी रेड अलर्ट आहेत.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 18, 2023
Konkan & parts of Madhya Maharashtra,including ghat areas & parts of Vidarbha to be watched for.
Keep watch on Nowcast during this period too. 1/2@RMC_Mumbai @imdnagpur pic.twitter.com/PXdMYl7QjH
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे राज्यात पाऊस सुरु आहे. ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहणार आहे. दरम्यान, पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटला तरी देखील राज्यातील धरणांमध्ये ३० टक्के जलसाठा होता. यामुळे शहरांमध्ये पाणी कपात करण्यासंदर्भात चर्चा होऊ लागली आहे. यातच राज्यात राज्यात पावसाने जोर पकडला असून यामुळे आता धरणसाठ्यात चांगली वाढ होणार आहे.