⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट, जळगावमध्ये अशी राहणार स्थिती?

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट, जळगावमध्ये अशी राहणार स्थिती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२४ । काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होत असून हवामान खात्याने आजपासून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलंय.

येत्या 24 तासांत मराठवाडा, खान्देशमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पुणे नवी मुंबई आणि रायगड पट्ट्यात हलका ते मध्यम पाऊस होईल, असं आयएमडीने सांगितलं आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशासह महाराष्ट्रातील वातावरण अनेक मोठे बदल होत आहे. आयएमडीने पुढील २४ तासांसाठी जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भ, मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी विदर्भातील काही जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार असून उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

जळगाव जिल्ह्याला दोन दिवस अलर्ट
हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यला २३ आणि २४ सप्टेंबरला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात सध्या ऊन सावलीचा खेळ सुरु आहे. दुपारच्या वेळेस तर उन्हाचे चटके बसत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.