आयएमए जळगावच्या वार्षिक सांस्कृतिक सोहळा उत्साहात

जळगाव लाईव्ह न्यूज । सोहळयाचे उदघाटन आयएमए सचिव डॉ.अनिता भोळे, अध्यक्ष डॉ. सुनिल गाजरे, आयएमए महाराष्ट्र राज्य कृती समिती अध्यक्ष डॉ. विलास भोळे, सांस्कृतिक समिती अध्यक्ष डॉ. मुर्तजा अमरेलीवाला, सचिव डॉ. ऋचा नवाल यांच्या हस्ते झाला. एकाहून एक सरस गायन, नृत्य कला सादर करण्यात आल्यात.
सुमधुर मेडिबिट्स च्या संगीतमय सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. यानंतर ग्लोबल वॉर्मिंग या महत्त्वपूर्ण विषयावर प्रभावी विनोदी लघुनाटिकेतून पर्यावरण समतोलाचा संदेश देण्यात आला.राजस्थानमधील प्रसिद्ध लोकनृत्य कालबेलिया या नृत्याविष्काराने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, सौ. ऐश्वर्या रेड्डी, जळगाव वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. वर्षा पाटील, सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना व शिक्षिका डॉ. अपर्णा भट कासार उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉक्टरांच्या विविध कलागुणांचे कौतुक केले व समाजासाठी वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक योगदानाबाबत प्रेरणादायी विचार मांडले.(आयएमए) जळगावच्या या उपक्रमामुळे डॉक्टरांच्या कलात्मक व सांस्कृतिक अंगांना वाव मिळत असून, त्यांच्या एकत्रित सहभागाने हा कार्यक्रम यशस्वी झाला.असे सांगीतले.

या कार्यक्रमात जवळजवळ ४०- ५० डॉक्टरांचा यात सहभाग होता. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयएमए अध्यक्ष आणि सचिव यांच्यासह डॉ. वैशाली ललित चौधरी (नाटककार), आणि त्यांच्या टीमने मोलाचे योगदान दिले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. प्रिती जोशी आणि डॉ. माजिद खान यांनी केले. समारोप जुन्या गाण्यांच्या मॅशपने झाला.