गुन्हेजळगाव जिल्हायावल

अवैध दारू वाहतूक करणाऱ्या तिघांना अडीच लाखांचा मुद्देमालसह अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । शिरपूर येथून मध्यप्रदेश कडे अवैधरित्या देशी दारू घेवून जाणाऱ्या एका वाहनावर यावल पोलिसांनी कारवाई केली. ज्यात देशी दारू किंमत २ हजार ८८o व वाहन अडीच लाख असा एकूण दोन लाख ५२ हजार ८८० किंमतीचा जप्त करण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री शिरपूरकडून मध्य प्रदेश अवैधरित्या देशी दारू एका वाहनाद्वारे वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरिक्षक सुधिर पाटील यांना मिळाली. त्यानी पोलीस स्थानकात तातडीने सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, सहाय्यक फौजदार अस्लम खान, हवलदार बालक बाऱ्हे, सुशिल घुगे, राहुल चौधरी, निलेश वाघ यांना बोलावून सायकाळी बुरुज चौकात वाहन तपासनी करण्यात आली असता शिरपूर कडून ( एमएच ०१ बिडी.९१२४ ) या कारच्या डिक्कित अवैधरित्या देशी दारू आढळून आली. टाँगो पंच या देशी दारूच्या ४८ बाटल्या मिळून आल्या व वाहनातील अतुल अरुण मानकर, शुभम नरेद्र मावळे, रा. पिंपळगाव ता. जळगाव जामोद व निलेश सुभाष बेलदार रा. दापोरा ता. जि. बऱ्हाणपूर म.प्रदेश या दिघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी यावल स्थानकात तिघांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक फौजदार अस्लम खान करीत आहे.

Related Articles

Back to top button