⁠ 
रविवार, मे 19, 2024

बापरे : स्फोटक जिलेटीनच्या कांड्यांचा साठा जप्त, आयजींच्या पथकाची कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । नाशिक परीक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकासह थाळनेर पोलिस स्टेशन आणि बाँब शोध पथक, धुळे यांच्या सहकार्याने शिरपूर तालुक्यातील अनेर येथे जिलेटिन कांड्या, इलेक्ट्रिक डेटोनेटर वायर आदी 8 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्या आहे. दरम्यान, यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी थाळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशन गोरख भामरे (रा.अनेर, ता.शिरपूर) व स्फोटके देणारा योगेश नामक तरुण असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. विशेष पथकातील निरीक्षक बापू रोहम, एपीआय सचिन जाधव, एपीआय उमेश बोरसे, सहायक फौजदार फुलपगारे, फुलपगारे, बाँब शोध पथकातील सहायक फौजदार बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, शकील शेख, पोलिस नाईक मनोज दुसाने, प्रमोद मंडलीक, सुरेश टोंगारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.