⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

उत्साही आणि निरोगी राहायचे असेल तर..: पी.एम.पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । रोग प्रतिकारशक्तीसाठी योग उत्तम पर्याय असून उत्साही आणि निरोगी राहण्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक पी.एम.पाटील यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या १०० दिवसांच्या उलटमोजणी अभियानातंर्गत योगाचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी बोदवड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रासेयो एककाद्वारे योग कार्यशाळेचे आयोजन दि. १८ ते २१ जून २०२२ दरम्यान रोज सकाळी ०७:०० वाजता आयोजन करण्यात आले आहे त्यावेळी ते बोलत होते. तसेच प्राणायाम, शुद्धी क्रिया, ध्यानधारणा इत्यादींचा साधा सराव रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कशी महत्त्वाची भूमिका बजावतो हे त्यांनी सविस्तरपणे सांगितले. यावेळी न. ह. राका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोदवड, शेखरसिंग चौहान, राज्य संयोजक पतंजली योगपीठ, हरिद्वार, मीना होले, संजय नंदवे, राजेश अंजाळे, जीवन राऊळ, प्रा. डॉ. अनिल बारी, प्रा. डॉ. वंदना बडगुजर कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संखेने यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अनिल बारी यांच्या स्वागतपर प्रस्ताविकाने झाली. प्रास्ताविकेत डॉ. बारी यांनी महाविद्यालयातील रासेयो एककाने १०० दिवसांच्या उलटमोजणी अभियाना अंतर्गत आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाची उपस्थितीना माहिती दिली व या कार्यशाळेत आपण योगाचे धडे घेऊन इतरांना याची माहिती देऊन दि. २१ जून २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन हा उत्कृष्टपणे साजरा करावा असे सांगितले.

यानंतर पतंजली योगपीठ, हरिद्वार चे राज्य संयोजक तसेच योग शिक्षक व महाविद्यालयातील वरिष्ठ क्लार्क शेखरसिंग चौहान यांनी विद्यार्थांना योगाचा सराव सुरू झाला. या कार्यक्रमाला सामान्य विद्यार्थ्याकडून चांगला प्रतिसाद लाभला. सदर उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन व आभार महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. वंदना बडगुजर यांनी केले. सदर योग कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रासोयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अनिल बारी, प्रा. डॉ. माधव वराडे, प्रा. डॉ. वंदना बडगुजर, प्रा. डॉ. ईश्वर म्हसलेकर, संभाजी टिकारे, निवृत्ती चौधरी, मोहन ताठे, हृषिकेश चौधरी, दीपक वाणी यांनी केले असे प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र शर्मा यांनी कळविले आहे.