काँग्रेसमध्ये बदल हवा असेल तर माझ्याबरोबर या : शशी थरूर

ऑक्टोबर 1, 2022 3:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी खासदार शशी थरुर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. थरूर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे आणि थरूर अशी थेट लढत होणार असल्याचे म्हटले जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना थरूर यांनी तुम्हाला काँग्रेसमध्ये बदल हवा असेल, तर मला मतदान करा असे म्हटले आहे.

पक्षामधील परिस्थती जैसे थे हवी असेल तर तुम्ही मल्लिकार्जुन खर्गे यांना मतदान करावे. तसेच तुम्हाला काही बदल हवा असेल तर त्यासाठी मी उभा आहे. तुम्हाला तळागाळातील लोकांमध्ये बदल पाहायचा असेल. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असे वाटत असेल. ब्लॉग, जिल्हा, राज्य पातळीवर तुम्हाला पक्षामध्ये नवी उर्जा हवी असेल, तर मला मतदान करा, असे शशी थरूर म्हणाले.

शशी थरूर यांनी आज (३० सप्टेंबर) आपल्या समर्थकांसह काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी त्यांनी राजघाट आणि राजीव गांधी स्मृतीस्थळावर प्रार्थना केली. नंतर ढोल-ताशाच्या गजरात काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

shashi tharoor jpg webp

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now