⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

लाच मागितल्यास करा थेट ‘एसीबी’कडे तक्रार

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१ । लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह आयाेजित केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दरवर्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते. जिल्ह्यात कुणीही लाच मागितल्यास आपण थेट तक्रार नोंदवू शकतात. नागरिकांनी घाबरून न जाता लाचखोरांना अद्दल घडवावी असे आवाहन पोलिस उपअधीक्षक एस. एस. पाटील यांनी केले आहे.

लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या दक्षता जनजागृती सप्ताह दरम्यान मंगळवारी सकाळी ११ वाजता कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देण्यात येईल. लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कार्यप्रणाली, भ्रष्टाचारविरोधी कायद्याची माहिती व अंमलबजावणी याबाबत शाळा, शासकीय कार्यालये, महाविद्यालये, ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येणार आहे.

नागरिकांनी भ्रष्टाचार संदर्भातील माहिती, लाच मागणाऱ्या लोकसेवकांची तक्रार व्हाॅट‌्सअँप क्रमांक ९९३०९९७७००, टोल फ्री क्रमांक १०६४, कार्यालय (०२५७) २२३५४७७ किंवा पोलिस उपअधीक्षक एस.एस.पाटील यांच्या ८७६६४१२५२९ या मोबाइलवर करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.