श्रीमंत आहात तर श्रीमंत रहा, अमित शहांना भेटायला कशाला जाता?

सप्टेंबर 25, 2022 12:27 PM

khadse gulabrao patil

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । एकनाथराव खडसे हे श्रीमंत आहेत तर त्यांनी श्रीमंतच राहावं अमित शहा यांना भेटायला कशाला जात आहात? असा खोचक टोला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आ. एकनाथराव खडसे यांना लगावला.

एकनाथराव खडसे नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते की, मी टपरीवाला नाहीये. मी वडिलोपार्जित श्रीमंत आहे. अशा शब्दात एकनाथराव खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. यावर उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, मी कधी नाही म्हणालो की मी टपरीवाला नव्हतो. मी टपरीवालाच होतो. मी कधी गाडीमध्ये रॉकेल भरलं नाही. आणि स्वतःला जर तुम्ही इतके श्रीमंत समजता तर अमित शहा यांना भेटायची गरज काय?

तर दुसरीकडे गुलाबराव पाटील यांना जळगाव जिल्ह्यच पालकमंत्री पद मिळाला आहे. यावेळी गेल्या अडीच वर्षात जसा काम केल. तसच येत्या काळातही चांगलं काम करीन असं गुलाबराव पाटील म्हणाले. गेल्या अडीच वर्षात जिल्ह्यातील नागरिकांना पालकमंत्री भेटला नाही असं झालं नाही आणि यापुढेही ते होणार नाही अस यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.

शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी गुलाबराव पाटील यांना नोटीस मिळाली म्हणून ते शिंदे गटात गेले असा आरोप केला होता. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की मला हिंदुत्वाची नोटीस मिळाली होती. बाळासाहेबांची विचारधारेची नोटीस होती. म्हणून मी शिंदे गटात गेलो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now