---Advertisement---
महाराष्ट्र अमळनेर जळगाव जिल्हा

भर उन्हात लग्नाला जात असाल तर नक्की वाचा हि बातमी : तुम्हाला ही बसेल धक्का

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२३। संपूर्ण राज्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. यामुळे भर उन्हात लग्नकार्यासाठी जात असाल तर तुह्माला हि बातमी वाचणे अतिशय गरजेचे आहे. अमळनेर येथे राहत असलेल्या आणि लग्न सोहळ्याला गेलेल्या विवाहितेला उष्माघाताचा फटका बसल्याने विवाहितेचा मृतयू झाला असल्याची घटना नुकतीच घडली आहे. शुक्रवार, 12 रोजी तांबेपुरा भागात घडली.

civil 1 jpg webp webp

अधिक माहिती अशी कि, रुपाली गजेंद्रसिंग राजपूत (33) असे मयत विवाहितेचे नाव आहे. रुपाली या अमरावती येथे विवाह सोहळ्यानिमित्त गेल्यानंतर गुरुवार, 11 रोजी सायंकाळी आल्यानंतर त्यांना अचानक मळमळ व उलट्या सुरू झाल्याने तांबेपुरा भागात खाजगी डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले. मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यानंतर पुन्हा उलट्या, मळमळ, भोवळ सुरू झाल्याने शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

---Advertisement---

अमळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे यांनी महिलेचे शवविच्छेदन केले. याबाबत अमळनेर पोलिसात महिलेचे दीर दीपक राजपूत यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विवाहितेचा मृत्यू उष्माघातानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मयत विवाहितेच्या पश्चात पती, सासू सासरे, दीर असा परीवार आहे. गजेंद्र उर्फ अतुल मंगलसिंग राजपूत यांच्या त्या पत्नी तर मंगलसिंग राजपूत यांच्या मोठ्या सून होत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---