जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२२ । संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. श्रद्धेनुसार नागरिक मोठ्या प्रमाणावर उपवास करतात. यात कित्येक जण एक वेळ जेवण व एक वेळ उपासाचे पदार्थ खातात. काहीजण दोन्ही वेळेस फक्त फळे किंवा फराळाचं खातात. मात्र काही वेळा दिवसभराच्या अतिकामामुळे केव्हाही भूक लागते अशावेळी मात्र अनेक जण काही न खाता उपाशी राहतात. अशावेळी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तब्येत बिघडण्याची शक्यता असते. यामुळे उपास करताना श्रद्धे सोबत आरोग्य ही जपणं अतिशय महत्त्वाच आहे. अशावेळी योग्य वेळी योग्य खाणं गरजेचे आहे
विशेष करून उपास करणाऱ्यांची दुपारी उपासाचे पदार्थ खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा फळ खाणं गरजेचं आहे. ज्यात सफरचंद, केळी, डाळिंब ,चीकू आदी फळे खाऊ शकतात किंवा फळांचा रस घेणे हे गरजेचे आहे. दिवसभर उपाशी राहण्यापेक्षा थोडं थोडं खाणं अतिशय गरजेच आहे. यामुळे आरोग्यावर परिणाम होत नाही. दिवसभर काही न खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होतो. दिवसभर उपाशी राहण्यापेक्षा फळे फळांचा रस किंवा इतर पदार्थ खाल्ले पाहिजेत जेणेकरून आरोग्यावर कोणताही धोका निर्माण होणार नाही.
नवरात्रीमध्ये नवरात्रीच्या उपासामध्ये सकाळी उपवासाचे पदार्थ खाल्ल्यानंतर दुपारी किंवा भूक लागते त्यानंतर बरेच जण काहीच खात नाहीत. यावेळी शारीरिक रोग प्रतिक्रिया शक्ती कमी होऊन आजारी पडण्याची शक्यता असते.