मंत्रिमंडळ विस्तार झाला तर दुसऱ्या क्षणाला पडेल – आ. एकनाथराव खडसे

ऑक्टोबर 2, 2022 5:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२२ । राज्य सरकारला मंत्रिमंडळ विस्तार झाला तर सरकार पडण्याची भीती वाटत आहे. म्हणूनच मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झालेला नाही. याउलट जर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर दुसऱ्या क्षणाला पडेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

MAL khadse jpg webp

जळगाव येथे झालेल्या सभेमध्ये एकनाथराव खडसे बोलताना म्हणाले की, मी या राज्यातला एकमेव आमदार आहे. जो म्हणत नाही मला मंत्री करा. बाकी सर्वांनाच मंत्री व्हायचं आहे. शिंदे गटातील 50 आमदारांना मंत्रिपद हव आहे. अपक्षांना देखील मंत्रिपद हवं आहे. अशावेळी जर मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर दुखावलेले आमदार सरकार अस्थिर करतील याची भीती वाटत असल्याने अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशी टीका एकनाथराव खडसे यांनी केली.

याचबरोबर एकनाथराव खडसे असे म्हणाले की, ज्या दिवशी असं वाटेल की महिनाभरात किंवा पंधरा दिवसात हे सरकार पडतंय. त्याचवेळी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल. कारण की, ज्यांना मंत्रिपद मिळाला नाही त्यांना प्रचंड खतखदिला सामोरे जावं लागत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now