⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

आदर्श विवाह! विधवा महिलेसोबत लग्न करून मनियार बिरादरी’च्या तरुणाने दिला आधार…

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । मनियार बिरादरी’च्या तरुणाने एका मुलीची आई असलेल्या विधवा महिले सोबत लग्न समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. दरम्यान, या जोडप्याचे जिल्हा मन्यार बिरादरीतर्फे गौरव करण्यात आला.

खंडवा येथील रहिवासी “सालेहा परवीन” हीचा लग्न मुक्ताईनगर येथील तरुणासोबत झाले होते. दुर्दैवाने कोरोनाच्या पहिल्या लाटेत लग्नाच्या पाच महिन्यातच “सालेहा” ही विधवा झाली. परंतु, दुर्दैव असे की तेव्हा ती चार महिन्याची गर्भवती होती. पतीचे दुःख व पोटात गर्भ घेऊन ती माहेरी खंडवा येथे आली. त्यांनतर “सारा” ही मुलगी झाली “सालेहा”आपल्या “सारा” मुली सोबत आपले उदरनिर्वाह करत होती. जळगाव मनियार वाड्यातील रहिवासी सय्यद उमर (वय २४) या तरुणाने “सालेहा परवीन” या महिलेची विवाह करण्यासाठी होकार देऊन खंडवा येथे जाऊन “सालेहा परवीन” सोबत लग्न केले व पत्नी सोबत १४ महिन्याची “सारा” हिला जळगाव येथे घेऊन आले.

“वलिमा” च्या माध्यमाने सालेहा व उमर चे बिरादरी ने केले गौरव

मानियार बिरादरी’च्या २४ वर्ष तरुणाने २१ वर्ष विधवा महिलेशी तिच्या १४ महिन्याची मुलगी “सारा” सह स्वीकार केल्याबद्दल
जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांच्यातर्फे दोघा विवाहितांना व लहान बाळाला भेट रुपी वस्तू देण्यात येऊन त्यांचा गौरव केला. या प्रसंगी सालेहा परिवाराचे पूर्वाश्रमीचे सासरे रफिक चौधरी, काका सासरे हकीम चौधरी, सासू शहेनाज बी (सर्व मुक्ताई नगर) धुळे येथील डॉ. सलीम शेख, जळगावचे सय्यद चाँद, सोनगीरचे आरिफ खान व लियाकत खान, अडावद चे अब्दुल रज्जाक अब्दुल नबी व साजिद शेख सलीम, साजिद सय्यद, ताहेर शेख, तय्यब शेख, आबिद हारून ,अब्दुल रउफ रहीम, अल्ताफ शेख, मुजाहिद खान, अख्तर शेख, हरीश सय्यद, महमूद टेलर, फारूक टेलर उपस्थित होते.