बातम्या

मुस्लिम समाजात आदर्श विवाह : साखरपुड्याला आले अन् लग्न लावून गेले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । रावेर येथे खिर्डी येथील शेख शाहरुख शेख भिकन याच्या साखरपुड्यासाठी गेले असता तिथून थेट लग्न लावून आले. असून परिसरात त्यांच्या या कार्याचा भरभरून कौतुक होत आहे. सध्या मुस्लिम समाजामध्ये साध्या पद्धतीने व कमी खर्चयात लग्न समारंभ पार पाडण्याची सवय प्रत्येकात निर्माण होण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात आहे. इस्लाम धर्मातील प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.अ.स ) यांच्या शिकविण्यास अनुसरून लग्न हे साध्या पद्धतीनेच करण्याचे सांगितले आहे.

लग्न ठरविण्याच्या वेळी काही भागात हुंडाप्रथा म्हणजे मुलाच्या कुटुंबाकडून पैसे ठरवले जातात. हा एक प्रकारचा सौदा आहे?तसेच मागून हुंडा घेणे हे कायद्याने गुन्हा सुद्धा आहे. हुंडाप्रथा हे समाजाला काळिमा फासणारी प्रथा आहे या वर पूर्णपणे बहिष्कार टाकावा या उद्देशाने परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी कमी खर्चयात तसेच मुलींच्या कुटुंबांवर जास्त भर नको ही संकल्पना समोर ठेऊन आता साखरपुड्यातच लग्न संपन्न ह्यावा या वर भर दिले आहे.

रावेर तालुक्यातील खिर्डी येथील शेख शाहरुख शेख भिकन याचा रावेर येथील शेख शाफिक यांच्या मुलीचा लग्न काही दिवसांपूर्वी ठरला होता. दि २० रविवार रोजी मोजक्या पाहुण्यांना घेऊन ते रावेर येथे साखरपुड्या साठी गेले असता चिनवाल येथील शेख इरफान शेख कुतबुद्दीन,निसार खान,निसार शेख,खिर्डी येथील साबीर बेग,वसीम खान,अमजद खान,यांनी वधू व वर यांच्या कुटुंबाला साखरपुड्यातच लग्न संपन्न करा असा सल्ला दिला असता दोन्ही किटुंबांनी यात सहमती दर्शविली.

येथे वाड्यातील युवा मंडळी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले साखरपुड्याचा रूपांतर लग्न झालं. या प्रकारे त्यांनी समाजात एक आदर्श त्यांच्या या कार्याची परिसरात भरभरून कौतुक होत आहे.

हे देखील वाचा:

Related Articles

Back to top button