⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | नोकरी संधी | बँकेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी ; IBPS मार्फ़त लिपिक पदाच्या ७८५५ जागा

बँकेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी ; IBPS मार्फ़त लिपिक पदाच्या ७८५५ जागा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२१ । सरकारी बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. आयबीपीएसतर्फे विविध सरकारी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये क्लर्क पदाच्या ७८५५ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

पदाचे नाव : लिपिक

या बँकांमध्ये केली जाणार भरती?

या भरतीअंतर्गत बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, , यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यामध्ये भरती केली जाणार आहे.

हे पण वाचा : सुवर्णसंधी…10 वीच्या गुणांच्या आधारे रेल्वेत 4103 पदांवर भरती

पात्रता :

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठात किंवा इतर कोणत्याही उच्च शैक्षणिक संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. किंवा त्याच्याकडे त्या समकक्ष पात्रता असणे गरजेचे आहे.

 वयाची मर्यादा :

01 जुलै 2021 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

निवड प्रक्रिया :

निवड प्रक्रियेत प्रत्येक पदासाठी लेखी परीक्षा असेल. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीच्या फेरीला उपस्थित राहावे लागेल. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांना अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली सर्व कागदपत्रे दाखवावी लागतात.

अर्ज शुल्क :

सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये आहे. स्क्रीनवर विचारलेली माहिती देऊन डेबिट कार्ड (रुपे/ व्हिसा/ मास्टरकार्ड/ मेस्ट्रो), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, कॅश कार्ड/ मोबाईल वॉलेट वापरून पेमेंट करता येते.

हे पण वाचा : नोकरीची सुवर्णसंधी….SBI स्टेट बँकेत 2056 जागांवर बंपर भरती

अर्ज सुरू होण्याची तारीख – ७ ऑक्टोबर २०२१

अर्जाची शेवटची तारीख – २७ ऑक्टोबर २०२१

भरतीसंदर्भातील नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.