fbpx

सुवर्णसंधी…10 वीच्या गुणांच्या आधारे रेल्वेत 4103 पदांवर भरती

SOUTH CENTRAL RAILWAY BHARTI 2021

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२१ । रेल्वे रिक्रूटमेंट सेल, दक्षिण मध्य रेल्वे (RRC-SCR) ने अप्रेन्टिस पदासाठी भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागितले आहे  आरआरसी-एससीआर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 4 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर आहे.

यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट scr.indianrailways.gov.in ला भेट देऊन अर्ज करावा लागेल. RRC-SCR च्या भरतीअंतर्गत एकूण 4103 उमेदवारांची प्रशिक्षणार्थीसाठी निवड केली जाईल. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही आणि मुलाखतीची गरज भासणार नाही. यासाठी उमेदवारांची निवड 10 वीच्या गुणांच्या आधारे केली जाईल. तर सिकंदराबाद विभागात नियुक्ती दिली जाईल.

या पदांसाठी होणार भरती

1) सुतार – 18 पदे.
2) डिझेल मेकॅनिक – 531 पदे.
3) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 92 पदे.
4) इलेक्ट्रीशियन – 1,019 पदे.
5) फिटर – 1,460 पदे.
6- MMTW- 5 पदे
7) वेल्डर – 553 पोस्ट
8- MMW- 24 पदे.
9) चित्रकार – 80 पदे
10- मशीनिस्ट – 71 पदे.
11. एसी मेकॅनिक – 250 पदे.

पात्रता :

प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, 10 वी पास असणे अनिवार्य आहे, किंवा 10+2 पद्धतीमध्ये समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून 50% गुणांसह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांचे वय किमान 15 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे असावे.

RRC-SCR अप्रेंटिस भरतीसाठी महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख- 04-10-2021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 03-11-2021

ऑनलाइन अर्ज कसा करावा
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट scr.indianrailways.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. वेबसाइटवर ऑनलाईन अर्जाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच वेळी, श्रेणीनुसार रिक्त जागा तपशील देखील अधिसूचनेमध्ये उपलब्ध आहेत.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज