अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; पती जागीच ठार, पत्नी व मुलगी जखमी

मे 29, 2021 10:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ । अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघात पती जागीच ठार झाला, तर पत्नी व मुलगी जखमी झाल्याची घटना महामार्गावरील हरताळा फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी घडली. अमित प्रल्हाद चौधरी (वय ३६, रा. कोथळी) असे मयताचे नाव आहे.

accident

याबाबत असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील रहिवासी असलेले अमित प्रल्हाद चौधरी (वय ३६, रा. कोथळी), त्यांची पत्नी प्रीती व लहान मुलगी लिखिता हे तिघे मोटारसायकलने (क्र. एमएच १५ – एचएफ ९०४८) नाशिककडे जात होते. तेव्हा हरताळा फाट्याजवळ असलेल्या हॉटेल फ्लोरासमोरच अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अमित चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी प्रीती व लिखिता या दोन्ही गंभीर जखमी झाल्या. दोघींना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अमित हे नाशिक येथे प्लम्बिंगचे काम करीत होते. लॉकडाऊनमुळे ते घरी कोथळी येथे आलेले होते. शुक्रवारी रात्री ते नाशिकला जात होते. जात असतानाच रस्त्यात त्यांचा हा अपघात झाला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद श्रीनाथ करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now