⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, पती ठार, पत्नी जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील पहूर येथील राजश्री कोटेक्स जवळ घडलीय. ज्ञानेश्वर पांडुरंग सोनवणे (वय ५०, राहणार शेंदुर्णी लिहा तांडा, ता. जामनेर) असे मृताचे नाव आहे.तर सरला ज्ञानेश्वर सोनवणे (वय ४५) असे त्यांच्या पत्नीचे नाव असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

याबाबत असे की, पहूर येथील जामनेर रोड लगत असलेल्या राज्यश्री कोटेक्स जवळ काल रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल क्रमांक एम. एच.०५ सी. डी.४०३२ वरील मोटारसायकल स्वार ज्ञानेश्वर सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी सरला या गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच आमदार गिरीश महाजन यांनी तातडीने पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात येऊन मयताच्या नातेवाईकांची चौकशी करून त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांनी गंभीर जखमी असलेल्या सरला सोनवणे यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या सुचना दिल्या. याबाबत रात्री उशीरापर्यंत पहूर पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.