पत्नीला घेण्यास गेलेला पतीला सासुरवाडीत मारहाण, डोंगर कठोरामधील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील माहेर असलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेला पती व त्याच्या नातेवाइकास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. तसेच ठार मारण्याची धमकीदेखील देण्यात आली. बुधवारी सकाळच्या या घटनेबाबत यावल पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

crime 81 jpg webp

भुसावळ येथील मुस्लिम कॉलनीतील बहादूर शाह कादर शाह यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी रूक्सानाबी शाह ही माहेरी डोंगर कठोरा येथे आहे. बुधवारी तिला नेण्यासाठी बहादूर शाह हे डोंगर कठोरा येथे गेले होते. तेथे संशयित इरफान शाह पीरन शाह, शकीलाबी गफूर शाह व तस्लिमाबी शाह (सर्व रा.डोंगरकठोरा) यांनी बहादूर शाह व सोबतच्या नातेवाइकांना मारहाण केली. त्यांच्या पत्नीला सोबत पाठवण्यास नकार दिला. ठार मारण्याची धमकी दिली. सर्व घटना गफूर शाह बहादूर शाह (रा.वरणागाव) व शकूर शाह बहादूर शाह यांच्यासमोर घडली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now