जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । जामनेर तालुक्यातील पळासखेडा बुद्रुक येथील बस स्टॅन्ड मध्ये गेल्या दोन-तीन महिन्यापासून एक मनोरुग्ण महिला वास्तव्यास आहे. ती मनोरुग्ण असल्याने तिच्याकडून नको गोष्टी बोलल्या जात होत्या. यामुळे काही लहान मुलं तिची टिंगल करीत होते. ही बाब माणुसकी समुहाच्या टीमला व जामनेर पोलीसांनी कळाली. त्यांनी या मनोरुग्ण महिलेला खाजगी वाहनांनी मानवसेवा तिर्थ वेले, चोपडा नरेंद्र पाटील यांच्या येथे अन्न वस्त्र निवारा करीता दाखल करण्यात आले.
ही महिला मनोरुग्ण असल्याने रात्री अपरात्री जोर जोरात आरोळ्या मारणे, नेहमी बडबडत असणे यामुळे लहान मुलं तिची टिंगल करीत होते. त्यामुळे या महिलेला न्याय मिळावा. यासाठी माणुसकी समूहाचे सदस्य योगेश वराडे यांनी माणुसकी ग्रुप वर व्हाट्सअप मेसेज केला. व जळगाव माणुसकी समूहाचे समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना सदरील मनोरुग्ण महिलेची माहिती दिली. त्यानंतर गजानन क्षीरसागर, चंद्रकांत गीते यांनी तात्काळ रात्री पळासखेडा बुद्रुक घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम चालु केली असता. ती महिला बस स्टँड परिसरात झोपलेली आढळून आली. चौकशी केली असता ती काहीतरी बडबडत होती. परंतु, प्रश्नांना व्यवस्थित उत्तर देत नव्हती. गावातील काही व्यक्तींनी सांगितल्याप्रमाणे ती इथेच राहत आहे. व येथील नागरिक तिला खाण्यासाठी देत होते. तसेच काही दिवसापूर्वी ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच नवीन कपडे देखील दिल्याचे म्हणाले, या मनोरुग्ण महिलेला खाजगी वाहनांनी मानवसेवा तिर्थ वेले, चोपडा नरेंद्र पाटील यांच्या येथे अन्न वस्त्र निवारा याकरीता दाखल करन्यात आले. यावेळी समाजसेवक गजानन क्षीरसागर, योगेश वराडे (जळगाव पोलीस), चंद्रकांत गीते (CRPF), राजु खरे, कैलास पाटील, जामनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र ठाकरे, होमगार्ड सुरज चौधरी, उमेश बुंदले, मनीषा धमाण, पळासखेडा बू गावकरी, माणुसकी समूहाच्या टीमने मदत कार्य केले.