जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । शिवसेनेचे बंडखोर आमदार तथा मंत्री गुलाबराव पाटील यांना दुसऱ्यांदा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. पहिल्यांदा जेव्हा पालकमंत्री पद मिळाले तेव्हा गिरीश महाजन हे गुलाबराव पाटील यांचे प्रमुख विरोधक समजले जात होते. मात्र आता आमदार एकनाथराव खडसे हे जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील यांना आव्हान देणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये कधीच राजकीय सख्य पाहायला मिळालं नाही. यामुळे आता गुलाबराव पाटील हे खडसेंच आव्हान कसं पेलणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.
महाविकास आघाडीतुन बाहेर पडत शिवसेनेच्या शिंदे गटाने भारतीय जनता पक्षासोबत जाऊन युती केली आणि महाराष्ट्रात आपली सत्ता बसवली. यामुळे गेल्या तीन महिन्यात गुलाबराव पाटील यांचे विरोधक बदलले आहेत. विधान परिषद निवडणूक होण्याआधी गुलाबराव पाटील यांचे जिल्ह्यातील प्रमुख विरोधक हे गिरीश महाजन होते मात्र तेच आता एकनाथराव खडसे झाले आहेत. एकनाथराव खडसे यांचा जळगाव जिल्ह्यात चांगलाच दबदबा आहे. वेळोवेळी आपला प्रभाव त्यांनी दाखवून दिला आहे. विधान परिषदेमध्ये देखील त्यांनी ज्या प्रकारची भाषणे केली. त्यामुळे एकनाथराव खडसे यांचा अभ्यासपूर्ण स्वभाव आणि त्यांच्या अतला कडवट विरोधक पाहायला मिळाला आहे. पर्यायी येत्या काळात खडसे – पाटील संग्राम पाहायला मिळेल यात काही वाद नाही.
एकनाथराव खडसे यांनी भाजप सोडल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेत गुलाबराव पाटील असतानाही आणि राज्यात राष्ट्रवादी शिवसेनेची महाविकास आघाडी सरकार असतानाही खडसे – पाटील यांच्यातले राजकारण चांगलेच तापले होते. यामुळे आता दोघेही विरोधात असल्यामुळे खडसे – पाटील राजकारण अजून तापणार, अजून गाजणार यात काही शंका नाही.
राज्याचे पालक पाणीपुरवठा मंत्री व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना दुसऱ्यांना पालकमंत्री पद मिळाले आहे. यावेळी पाटील यांची मोठी कसोटी असेल. कारण शिवसेनेत बंड केल्यामुळे शिवसेनेतील त्यांचे जुने सहकारी त्यांच्या विरोधात गेले आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि एकनाथराव खडसे यांच्या सारखा एका मातब्बर नेता अशा दुधारी तलवारीशी गुलाबराव पाटील यांना संघर्ष करायचा आहे.