गिरणेच्या जलसाठ्यात एकाच दिवसात मोठी वाढ; जिल्ह्यातील कोणत्या धरणात किती जलसाठा?
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सतत पाऊस सुरु आहे. मात्र मागील दोन दिवसांत तर अतिपाऊस झाल्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहेच. दरम्यान सध्या होत असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील लहान- मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ होत आहे. विशेष जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणाच्या जलसाठ्यात रविवारी (४ ऑगस्ट) एका दिवसातच ५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील एकूण जलसाठ्यांमधील सरासरी ३० टक्क्यांवर पोहोचली आहे. मंगरूळ, सुकी ही धरणं आधीच ओव्हरफ्लो झाली आहेत. तर नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असल्याने गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणातून गिरणा धरणात मोठ्याप्रणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. गिरणा धरणाच्या जलसाठ्यात रविवारी एका दिवसातच ५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
यामुळे आता गिरणेतील जलसाठा २६ टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिकमध्ये अजूनही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे येत्या काही दिवसात गिरणेतील जलसाठ्यात ३० टक्क्यांपर्यंतची वाढ होण्याचा अंदाज आहे.दुसरीकडे हतनूर धरणाच्या जलसाठ्यातदेखील वाढ होत आहे. यामुळे हतनूर धरणाचे १२ दरवाजे उघडले असून, त्यातून ४६ हजार १५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हतनुरसह वाघूर धरणातील जलसाठा ६४ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी ४ ऑगस्टपर्यंत हा जलसाठा ५६ टक्क्यांवर होता
सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा असा
धरणाचे नाव–जलसाठा टक्के यंदाचा
हतनूर–२८.५
गिरणा–२०
वाघूर–६४.८६
मध्यमप्रकल्प
अभोरा–७५.८८
मंगरूळ–१००
सुकी–१००
मोर–६८.२७
अग्नावती–०.६३
हिवरा–०
बहुळा–११.८८
तोंडापूर–३८.११
अंजनी–६.९३
गूळ–६२.२४
भोकरबारी–०
बोरी–०
अंजनी–६.२३
मन्याड–०
शेळगाव–७.७०
एकूण–२९.१७ टक्के