⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

किमान तापमानात ६ अंशाची घसरण; रात्रीचा गारठा वाढला

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२२ । गेल्या काही दिवसापासून तापमानात अनेक बदल जाणवायला मिळाले. जळगाव जिल्ह्यात सध्या दुपारी उन्हाचा चटका बसत आहे तर रात्री सध्या थंडीचा कडाका जाणवत आहे. बुधवारच्या तुलनेत गुरूवारी किमान तापमान तब्बल ६ अंशाने घटल्याने रात्री थंडीची तीव्रता वाढली हाेती. किमान तापमानासाेबत कमाल तापमान देखील ३० अंशापर्यंत झाली आहे.

काल जिल्ह्यात काहीसे वातावरण ढगाच्छादित हाेते. येत्या साेमवारपर्यंत काही अंशी हेच चित्र असेल. वाऱ्याचा वेग वाढलेला असल्याने तापमानात घट जाणवत आहे. किमान तापमान तर अवघे १०.३ अंश आहे. त्यामुळे रात्री आणि सकाळी ९ वाजेपर्यंत गारठा जाणवतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार साेमवारपर्यंत वातावरण काही अंशी ढगाळ असेल. तर रविवार आणि साेमवारी दुपारी तापमान ३४ अंश असेल

दरम्यान, मध्य भारतात मधील काही भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने पूर्व विदर्भातील काही भागामध्ये शुक्रवारी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. विशेष म्हणजे लाखांदूर, साकोली, तुमसर व लाखनी ह्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने याच तालुक्यात शक्यता जास्त आहे. त्यामुळे ह्या भागातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासूनचे ढगाळ वातावरण आणि आता असा इशारा देण्यात आल्याने काढणीला आलेल्या पिकावर याचा परिणाम होणार आहे.

हे देखील वाचा :