⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अजितदादांसोबत किती आमदार? मंत्री अनिल पाटील यांचा मोठा दावा

अजितदादांसोबत किती आमदार? मंत्री अनिल पाटील यांचा मोठा दावा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ५ जुलै २०२३ | मुंबईतील वांद्रे येथील एमआयटी या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे, शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक दुपारी १ वाजता बोलावली आहे. आज शरद पवार आणि अजित पवारांनी आज स्वतंत्र बैठका बोलावल्या असून दोघांकडून आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. यामुळे नेमक्या कोणत्या बैठकीला जायचे? यावरुन आमदार कात्रीत सापडले आहेत. दरम्यान, अजित पवारांसोबत ४० पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रतोद अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे.

राष्ट्रवादीतील या फुटीनंतर शरद पवार सुद्धा मैदानात उतरले. आज शरद पवार आणि अजित पवारांनी आज स्वतंत्र बैठका बोलावल्या असून दोघांकडून आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार आणि खासदार आहेत? याचा निश्चित आकडा अजूनही समोर आलेला नाही. दरम्यान, अजित पवारांसोबत ४० पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रतोद अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे.

त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हिप जारी केला आहे. याबाबत बोलतांना अनिल पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. आम्ही सगळ्या आमदारांना व्हीप बजावला आहे, असे अनिल पाटील म्हणाले. तसेच, सरकारला कोणतेही बहुमत सिद्ध करायचे नाही. त्यामुळे याठिकाणी आकडा महत्त्वाचा नाही. पक्षातील ९५ टक्के आमदारांचे समर्थन अजित पवारांसोबत आहे. आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत, आमचा व्हिप सर्व आमदारांना लागू होतो. गरज पडल्यास आम्ही देखील न्यायलयीन लढाईला सामोरे जाऊ, असेही अनिल पाटील यांनी सांगितले.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.