⁠ 
रविवार, मे 19, 2024

धरणगावला घराला आग.. संसारोपयोगी साहित्य जळून खाक!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Dharangaon NEws-जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२२ । धरणगाव तालुक्यातील पष्टाणे खु. येथे शुक्रवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटने आग लागल्यामुळे अचानक घराला आग लागली. या आगीत किंमती सागवान लाकडांसह संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.

माधवराव बाबुराव सोनवणे हे रात्री आपल्या मुलांसोबत घरात झोपले होते. दि 30 सप्टेंबर रोजी सकाळी एक ते दीड वाजेच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली. झोपेत असताना श्वास गुदमरायला लागल्याने माधवराव सोनवणे व मुलगा मुकेश सोनवणे यांना जाग आली असता आग लागल्याचे निदर्शनास आले. आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्याच सोबत गावातील तरुण, नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी धावपळ केली. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने ती वाढतच गेली.

या आगीत जुने सागवान लाकूड, फ्रीज, मोबाईल तसेच बहुतांश संसारोपयोगी साहित्य आगीने खाक केले. सोनवणे कुटुंब मजुरी करून आपला उदर निर्वाह करत असल्याने पाई पाई जमा करून उभा केलेला संसार डोळ्यासमोर भस्म होतांना त्याचा अश्रूंचा बांध फुटला होता. यावेळी गावचे सरपंच किशोर पाटील,पोलीस पाटील, नागरिक यांनी त्यांना धीर दिला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा घटनास्थळी जाऊन तलाठी ज्योती लोखंडे मॅडम व ग्रामसेवक साहेबराव देवरे हे पंचनाम्याची प्रक्रिया करत होते.