वसतिगृहाच्या अधीक्षिकेचा दुचाकीवरच हृदयविकाराने मृत्यू ; जळगावातील दुर्दैवी घटना

सप्टेंबर 15, 2024 11:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२४ । सुटी असल्याने पतीची तब्येत दाखवण्यासाठी दवाखान्यात जात असताना दुचाकी चालवणाऱ्या ३६ वर्षीय पत्नीचा चक्कर येऊन पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. आशादीप महिला वसतिगृहाच्या अधीक्षिका मयूरी देवेंद्र कर्पे-राऊत असे या मृत महिलेचे नाव आहे. या धक्क्याने त्यांच्या पतीची तब्येतही बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

Mayuri Raut

त्यांचे पती देवेंद्र राऊत हे जिल्हा परिषदेत महिला बालकल्याण विभाग येथे जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत असून मयुरी करपे या आकाशवाणी चौकातील जिल्हा महिला बालकल्याण विभागात कार्यरत आहेत. शनिवारी दि. १४ सप्टेंबर रोजी मयुरी करपे यांनी दुपारी पती देंवेंद्र यांना एका खाजगी रुग्णालयात बीपीचा त्रास होत असल्याने त्यांना तपासण्यासाठी आणले होते.

याच वेळी मयुरी करपे यांची प्रकृती खराब झाल्याने त्या कोसळल्या. त्यानंतर तत्काळ दोघं पतिपत्नीला खाजगी रुग्णालयात नेले. त्याठिकाणी देवेंद्र राऊत यांच्यावर उपचार सुरु आहे. तर मयुरी करपे राऊत यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते.

दरम्यान शवविच्छेदनकामी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. नातेवाईकांसह सरकारी अधिकाऱ्यांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now