---Advertisement---
राशिभविष्य

कामात येणारे अडथळे दूर होतील, आर्थिक लाभही मिळेल ; बुधवारचा तुमच्या राशीसाठी कसा असेल..

---Advertisement---

मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक लाभ मिळेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. तब्येत सुधारेल. या राशीच्या लोकांची त्यांच्या आवडत्या ठिकाणी बदली होऊ शकते. गणेशाची आराधना करा.

rashi 5 jpg webp

वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. कामात येणारे अडथळे दूर होतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. लव्हमेटसोबत डिनरला जाण्याचा बेत होईल. श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप करा.

---Advertisement---

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ राहील. दुर्गा सप्तशती पाठ करा.

कर्क
कर्क राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभ होईल. आपल्या कामात लक्ष द्या. वादविवादापासून दूर राहा. हिरवी मूग डाळ दान करा

सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला जाणार आहे. बुध मंत्रांचा जप करा.

कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील. तुमच्या रखडलेल्या कामात प्रगती होईल. घराच्या मंदिरात तुपाचा दिवा लावावा.

तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुमची कोणी खास भेट होईल. घरात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये वादापासून दूर राहा. विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे. गणपतीला दुर्वा अर्पण करा.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्ही काही कामानिमित्त सहलीला जात असाल तर ते तूर्तास पुढे ढकला. गरजूंना मदत करा.

धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त असणार आहे. जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याचा बेत आखू शकता. खाजगी नोकरीत लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी दिवस शुभ आहे. रणहर्ता गणेश स्तोत्राचे पठण करावे.

मकर
मकर राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला जाणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. आर्थिक लाभ मिळेल. सरकारी विभागांशी संबंधित लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. गाईला हिरवे गवत खायला द्यावे.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. नोकरदारांनी काळजी घ्यावी. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळावे. व्यवहार टाळा. बुध मंत्रांचा जप करा.

मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. वैवाहिक जीवनात प्रेम कायम राहील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण होतील. रणहर्ता गणेश स्तोत्राचे पठण करावे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---