जळगाव जिल्हा

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जळगाव लाईव्ह न्यूज । स्व. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘जीवनरंग विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे’ देखील आयोजन करण्यात आले आहे. बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा, अरुश्री हॉस्पिटल आणि मुक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर मंगळवार (दि.३०) रोजी अरुश्री हॉस्पिटल येथे सकाळी ८ ते १२ या दरम्यान पार पडले.

bb

रिंगरोडवरील अरुश्री हॉस्पिटलच्या डॉ.परिक्षीत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.स्वाती बाविस्कर यांच्या विशेष सहकार्याने झालेल्या या आरोग्य तपासणी शिबिराला मुक्ती फाऊंडेशन जळगावचेही सहकार्य लाभले होते. उद्‌घाटन प्रसंगी नटराज पूजन करुन आरोग्य तपासणीला सुरुवात करण्यात आली. नटराज पूजन प्रसंगी अरुश्री हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.स्वाती बाविस्कर, मुक्ती फाऊंडेशनचे मकुंद गोसावी, बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष पंकज बारी, नेहा पवार – गुजराथी, कोषाध्यक्ष सचिन महाजन यांची उपस्थिती होती. उद्‌घाटनानंतर डॉ.स्वाती बाविस्कर यांनी उपस्थित कलावंतांना आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी व औषध घेतांना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.

New Project 1

शिबिरात डॉ.स्वाती बाविस्कर, डॉ.हर्ष चौधरी, श्री.राहुल बनसोडे व अरुश्री हॉस्पिटलमधील आरोग्यसेवकांनी सहभागी कलावंतांच्या सीबीसी रक्त तपासणी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब तपासणी, ईसीजी आदी तपासण्या केल्या तसेच आवश्यक औषधांचे विनामूल्य वितरण केले. या शिबिराचा लाभ शहरातील ३८ कलावंतांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विनोद ढगे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे दिपक महाजन, मोहित पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, दर्शन गुजराथी, राहुल पवार यांनी परिश्रम घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button