जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२१ । महाराष्ट्रात करोना आणि ओमिक्रॉनचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
आता केवळ आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नाही तर अँटिजेन टेस्टवर आपण भर देणार आहोत. अँटिजेनच्या टेस्ट वाढवाव्या लागतील. अँटिजेन टेस्ट किट खरेदी केली तर त्याचा हिशोब जिल्हा प्रशासनाला कळवला पाहिजे. अँटिजेनमध्ये किती पॉझिटिव्ह होतात याचा रेकॉर्ड ठरवला पाहिजे. त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत, असं टोपे यांनी सांगितलं. क्वारंटाइनचा कालावधीही 7 दिवसांचा असणार आहे. क्वारंटाइन असताना लोकांनी नियम पाळणे बंधनकारक आहे.
राज्यातील मंत्री आणि आमदारांनाही करोनाचा संसर्ग झालेला आहे. याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. राज्यातील ७० आमदार आणि १० ते १५ मंत्री करोनाबाधित असल्याचे ते म्हणाले. हे सर्व दररोज कामानिमित्त फिरायचे. लोकांच्या सातत्याने संपर्कात होते. त्यामुळे या आमदार आणि मंत्र्यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
हे देखील वाचा :
- जळगाव शहरातून पुन्हा राजूमामा भोळे आमदार होणार? पाहा EXIT POLL
- जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- जळगाव जिल्ह्यात सूक्ष्म नियोजनामुळे मतदान सुरळीत; मतदान यंत्रात नगण्य त्रुटी
- जळगाव जिल्ह्यात संध्याकाळच्या 5 पर्यंत 54.69 टक्के मतदान; अनेक ठिकाणी शेवटच्या तासात मतदारांच्या केंद्रावरती रांगा