श्री जनार्दन हरीजी महाराजांनी घडविला इतिहास
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यमनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ चारधाम यात्रा काढण्यात आली. ज्यात 800 भाविक हे 28 बस तसेच तीन इनोव्हा व दोन पिकअप व्हॅनद्वारे सहभागी झाले. श्री जनार्दन हरीजींनी 800 भाविकांना चारधामचे दर्शन घडवून नवा विक्रम केला आहे. दरवर्षी पितृ पक्षात हजारो भाविकांना वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवर जाऊन यात्रा घडवली जाते शिवाय जे गरीब आहेत ते जास्त खर्च करू शकत नाहीत अशांचीही व्यवस्था जनार्दन महाराज करतात.
चारधाम यात्रा सुरू करण्यापूर्वी जयराम आश्रम हरीद्वार या भूमीत 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2022 या तीन दिवसात सत्संगाचे आयोजन करण्यात आले. प.पू.जगद्गुरू सतपंथाचार्य श्री ज्ञानेश्वरदासजी महाराज प्रेरणापीठ पिराणा, निर्मल पीठाधीश्वर स्वामी श्री ज्ञानदेवसिंहजी महाराज, जयराम आश्रमाचे महंत श्री ब्रह्मचारी ब्रह्मस्वरूपजी, महामंडलेश्वर मनमोहनदासजी, महायत्री प.पू. जितेंद्रनंदजी, विश्व हिंदू परीषदेचे अशोक तिवारी, महंत अरुणदासजी, महंत गुरुमालसिंहजी यांचे दर्शन व आशीर्वचनाचा लाभ मिळाला.