जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । जळगाव पासून पारोळा ५३ कि.मी. अंतरावर आहे. लक्ष्मीरमणा बालाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले शहर अशी या शहराची ख्याती आहे. झांशीची राणी लक्ष्मीबाईचे आजोळ असलेले हे शहर आहे. सदाशिवराव नेवाडकर यांनी सतराव्या शतकात हे शहर वसवले. ज्येष्ठ मराठी साहित्यिक कै. ह. ना. आपटे यांचे जन्मगांव पारोळा आहे. महामहोपाध्याय के. श्रीधरशास्त्री पाठक हेही पारोळ्याचेच होते. पारोळा येथील भुईकोट किल्ला व बालाजी देवस्थान यामुळे शहराला इतिहास व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे.

जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून जळगाव जिल्ह्याचे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आलं होते. जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी आम्हाला हे पुस्तक उपलब्ध करून दिले आहे. याच पुस्तकाचा आधार घेत जळगाव लाईव्ह पर्यटन विशेष मालिका सुरु करण्यात आली आहे.
भुईकोट किल्ला
पारोळ्याचा भुईकोट किल्ला हे येथील एक ऐतिहासिक स्थळ होय. हा किल्ला सपाट मैदानावर असून इ. स. १७२७ मध्ये जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधला. किल्ल्याची लांबी ५२५ फूट व रुंदी ४३५ फूट आहे. किल्ल्याच्या तटाभोवती सर्व बाजूंना पाण्याचे खंदक आहेत. पूर्वेला एक मोठा तलाव असून त्याला तीन बाजूंनी पायऱ्या आहेत. किल्ल्याभोवती दगड व चुन्याने बांधलेला एक व आतील बाजूस दुसरा असे दोन तट आहेत. किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वी एका लाकडी झुलत्या पुलाने व विशाल अशा उत्तुंग बुरुजांनी संरक्षिले होते. या लाकडी पुलावरून किल्ल्यात जाता येत असे. किल्ल्यावर एक दगडी बुरूज आणि जहागीरदारांचा महाल आहे, तसेच अनेक लहानलहान विहिरी आहेत. किल्ल्याच्या तटाच्या भिंतीत व बुरुजात अनेक लहान मोठी छिद्रे असून त्यातून येणाऱ्या शत्रूवर बंदुकीच्या गोळ्यांचा अचूक मारा करता येत असे. किल्ल्यात एक भुयार घर आहे. एक घोडेस्वार जाऊ शकेल इतके ते लांब, रुंद व उंच असून त्याची बांधणी मजबूत आहे. त्याचे प्रवेशद्वार गावापासून ५ मैलांवर असलेल्या नागेश्वर येथील महादेवाच्या मंदिराजवळ आहे. या किल्ल्यात प्राचीन असे एक महादेवाचे मंदिर आहे. इतिहासाची परंपरा लाभलेले हे स्थळ म्हणजे पारोळ्याचे वैभवच होय.
श्री बालाजी देवस्थान
विकांच्या नवसाला पावणारे दैवत म्हणून श्री बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे. गावाच्या मध्यभागी असलेले बालाजी महाराजांचे देवस्थान हे सुमारे २४० वर्षांपूर्वीचे असून त्याचा जीर्णोद्वार सन १९८१ मध्ये श्री. वल्लभदास मुरलीधर गुजराथी यांनी सुमारे तीस हजार रुपये खर्चून केला आहे.
भाविकारांच्या नवसाला पावणारे दैवत म्हणून श्री बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे. गावच्या मध्यभागी असलेले बालाजी मंदिराचे देवस्थान हे सुमारे दोनशे चाळीस वर्षाची असून त्याच्या प्रधान सन 1981 झाली श्री वल्लभदास मुरलीधर गुजराती यांनी सुमारे तीन हजार रुपये खर्चून केला.
मंदिराच्या आवारात प्रशस्त असे दगडी प्रवेशद्वार आहे. त्यावर एक नगारखाना आहे. मंदिरासमोरच एक गरुडखांब आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात आसनावर विराजमान झालेली ११ इंच उंचीची पंचधातूची बालाजीची सुबक मूर्ती आहे. या बालाजी मंदिराच्या नूतनीकरणासाठी शहरातील व परिसरातील भक्त मंडळींनी निधी संकलित करून मंदिराचे सन २०१६ साली नूतनीकरण केले आहे.