Saturday, May 21, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

लग्नापूर्वीच सासरच्या छळाला कंटाळून उच्चशिक्षित तरुणीने संपविले जीवन, २२ तासानंतर मृतदेह घेतला ताब्यात

suicide 5
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
March 27, 2022 | 1:57 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२२ । आतापर्यंत लग्न झालेल्या अनेक विवाहितांनी सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र, दोन आठवड्यांपूर्वीच साखरपुडा झालेल्या एका उच्चशिक्षित तरुणीने लग्नापूर्वीच सासरच्या छळाला कंटाळून जीवन संपविल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त करणऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी माहेरच्या लोकांनी पोलिसांकडे केली. ही घटना २५ राेजी सायंकाळी उघड झाली.

रामेश्वरी रवींद्र नागपुरे (बारी, वय २४, रा. कुऱ्हे पानाचे, ता. भुसावळ) असे मृत तरुणीचे नाव आहे. रामेश्वरीचे एमएपर्यंत शिक्षण झाले होते. तिचे चुलत भाऊ जीवन बारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा रावेर येथील भूषण ज्ञानेश्वर पाटील (बारी) या तरुणाशी रामेश्वरीचे लग्न ठरले होते. भूषण नाशिकमध्ये राहत असून, वैद्यकीय प्रतिनिधीचे काम करतो.विवाहानिमित्ताने सहा मार्च रोजी कुऱ्हे पानाचे गावात साखरपुडा झाला. त्याच्या आईने रवींद्र नागपुरे यांच्याकडून २५ हजार रुपये रोख घेतले. हुंड्यात तीन तोळ सोन्याचे दागिने व ५० हजार रुपये रोख द्यायची मागणी केली. ही मागणी नागपुरे यांनी मान्य केली होती. यानंतर भूषणने रामेश्वरीला फोन करून वारंवार पैशांची मागणी केली. चार दिवसांपूर्वी त्याने नागपुरे यांना रावेर शहरात बोलावून घेत त्यांच्याकडून हुंड्याची रक्कम व दागिने घेतले. मुलीच्या संसारासाठी नागपुरे यांनी दागिने व रोख रक्कम दिली हाेती. पैसे मिळाल्यानंतरही भूषणची हाव कमी झाली नाही. त्याने पुन्हा रामेश्वरीला फोन करून लग्न थाटात लावून देण्याची मागणी केली. लग्नात बग्गी पाहिजे, मोठ्या लॉनमध्ये लग्न करावे, स्टेजवर एसी हवा, मंडपात कुलर हवे अशा मागण्या भूषण व त्याची अाई करीत होती. ही बाब रामेश्वरीने वडिलांना सांगितली होती. या वेळी त्यांनी भूषणच्या आईस फोनवरून विचारणा केली असता त्यांनीही मुलाने सांगितलेल्या अटी कायम ठेवल्या होत्या. त्यानुसार नागपुरे नियोजनात व्यग्र झाले होते. काही दिवसांनी भूषणने रामेश्वरीला फोन करून ‘तू गावंढळ आहेस, मला पसंत नाही, मी हे लग्न मोडणार आहे’ असे बोलून हिणवले. त्याचे मन राखण्यासाठी रामेश्वरीने जिम लावली होती. जिममध्ये जाऊन वजन कमी करणार असल्याचे तिने भूषणला सांगितले. जिममध्ये व्यायाम करीत असल्याचे काही फोटो तिने व्हाटसअँपवरून भूषणला पाठवले होते. तरीही ‘आता त्याचा काही उपयोग होणार नाही, मी लग्न मोडणार आहे’ असा रिप्लाय भूषणने दिला हाेता.

नातेवाइकांनी २२ तासांनंतर रुग्णालयातून मृतदेह घेतला ताब्यात

रामेश्वरीला छळणाऱ्या भूषण व त्याच्या आई विरुद्ध गुन्हा दाखल करावा, तेव्हा मृतदेह ताब्यात घेऊ, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. सकाळपासून हे लोक भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात बसून होते. पोलिसांनी जबाब घेऊन चौकशी केली जाईल, दोषींवर गुन्हा दाखल करू, असे आश्वासन दिले. दुपारी २ वाजता मृतदेह ताब्यात घेतला.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव जिल्हा, घात-अपघात, भुसावळ
Tags: after being harassed by her father-in-law before marriageHighly educated young woman dies
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
golden nest dhingana

धिंगाणा : हॉटेलमध्ये गोंधळ, बाहेर पोलिसांशी वाद, तरुण-तरुणींविरुद्ध दोन गुन्हे दाखल

bhanudas pawar 2

पोलीस मित्र संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी भानुदास पवार

g.d.nursing college

देवकर नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी मोजक्याच जागा शिल्लक

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.