⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | गुन्हे | अरे बापरे : जळगावच्या सराफ व्यापाऱ्याला नगरमध्ये पोलिसांच्या मदतीने लुटले!

अरे बापरे : जळगावच्या सराफ व्यापाऱ्याला नगरमध्ये पोलिसांच्या मदतीने लुटले!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ ।  जळगाव तालुक्यातील एका सराफ व्यापाऱ्याला शेंद्रा येथील व्यापाऱ्याने पोलिसांच्या मदतीने लुटण्याचा खळबळजनत प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कट रचणाऱ्या व्यापाऱ्याला आणि एका पोलिसाला अटक करण्यात आली आहे. या प्रकारात एका पोलिसाने तब्बल २० लाख ७५ हजार ५३७ रुपयांचे सोने व रोख असलेली रकमीची बॅग लुटली होती. याप्रकरणी आरोपीच्या ताब्यातून दागिने आणि रोख अडीच लाख रुपये जप्त केल्याची माहिती निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली आहे.रामचंद्र दत्तात्रय दहिवाळ (४२, रा. साईबाबा मंदिरासमोर हिरापूर) असे त्या सराफाचे तर संतोष तेजराव वाघ (३५, रा. महाल सोसायटी, फ्लॅट क्र.१०५, साई मंदिरासमोर, चिकलठाणा) असे संशयित आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दोघांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी अशोक विसपुते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे जळगाव शहरामध्ये सराफाचे दुकान आहे. चार महिन्यापूर्वी त्यांचा दहिवाळ सोबत फोनवरून परिचय झाला होता. दहिवाळ यांचे भवानी ज्वेलर्स नावाचे दुकान असून ते नेहमीच विसपुतेंच्या संपर्कात होते. 12 सप्टेंबर रोजी दहिवाळणे विसपुते यांना फोन लावून मला मालाची गरज असून तुमच्या डिझाईन दाखवा असे सांगितलेहे नगरमार्गे कारने (एमएच १९, डीव्ही ६३३६) चालक दिनेश वाव्हळसह औरंगाबादेत आले. व्यापारी विसपुते यांनी दहिवायला दुकानातल्या दागिऱ्यांच्या डिझाईन दाखवल्यानंतर मला या डिझाईन आवडल्या हे सोने मी ठेवून घेतो आणि तुम्हाला चेक देतो असं म्हणाला, मात्र विसपुते यांनी रोख पैसे मागविले. यामुळे व्यवहार फिसकटला.

यानंतर रात्री दहा वाजताच्या सुमारास विसपुते केंब्रिज चौकात आल्यानंतर कारच्या मागून एक कार आली. त्यांनी थांबण्याचा इशारा केला. यावेळी कारमधून पोलीस संतोष वाघ उतरला. त्याने मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू आहे. दौरा म्हणजे काय कळतं का? तुम्ही कोण आहात असे म्हणत कारची तीन वेळा झडती घेतली. यावेळी मोबाईल बंद करण्यास सांगितले. त्यावर व्यापारी विसपुते यांना आधीच हृदयविकाराचा आजार असल्याने ते पुरते घाबरून गेले. कार मध्ये दागिने सापडल्यानंतर तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करतो. म्हणत आरोपी वाघ्याने तिथून ऐवज व रोख रक्कम घेतली. यामुळे विसपुते यांची अचानक तब्येत बिघडली. तब्येत ठीक झाल्यानंतर विसपुते यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास अर्जुन राऊत करत असून आरोपींना 17 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सोडवण्यात आली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह